मनसेचा महाआरतीचा निर्णय स्थगित

सोमवार, 2 मे 2022 (14:52 IST)
मनसेचा पुण्यातील अक्षय्य तृतीयेला आयोजित करण्यात आलेल्या महाआरती करण्याचा निर्णय स्थगित झाला आहे. मनसेचे राज्य प्रवक्ते योगेश खैरे यांनी याविषयीची माहिती दिली आहे. मनसे आणि हिंदुत्त्ववादी संघटनांच्या वतीने पुण्यात प्रत्येक शाखेत महाआरती  करण्यात येणार होती. उद्या रमजान ईद आहे. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय सध्यातरी स्थगित करण्यात आला आहे. मशिदींवरचे भोंगे काढण्यासाठी मनसे अधअयक्ष राज ठाकरे यांनी तीन मेचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचेही आव्हान दिले होते. तर तीन तारखेला मनसेतर्फे महाआरती आयोजित करण्यात आली होती. मात्र आत्ता मिळालेल्या माहितीनुसार या महाआरतीचा कार्यक्रम सध्यातरी स्थगित करण्यात आला आहे. मनसेच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती