At the right place even if it is late says Amit Shah अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासोबतचा माझा पहिला कार्यक्रम आहे. त्यामुळे अजित पवार यांना एक सांगतो, दीर्घ कालावधीनंतर आपण योग्य ठिकाणी बसला आहात. तुमची हीच जागा योग्य होती. मात्र आपण खूप उशीर केला, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. त्यावेळी अजित पवार यांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला.
अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी अजितदादांच्या सत्तेत सहभागी झाल्याबाबत मोठे विधान केले. अजितदादा, ब-याच काळानंतर तुम्ही योग्य जागी बसलात, या ठिकाणी येण्यास तुम्ही उशिर केला, असे शहा म्हणाले.
केंद्रीय सहकार संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शाह बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.
अजित पवार यापूर्वी २०१९ मध्ये भाजपसोबत आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. या सर्व घडामोडींमागील चाणक्य अमित शाह असल्याचे त्यावेळी म्हटले जात होते. परंतु शरद पवार यांनी चक्र फिरवली आणि अजित पवार काही तासांत पुन्हा स्वगृही आले. तिच आठवण अमित शाह यांनी अजित पवार यांना तर करून दिली नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे.