पुणे शहराकडे गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांच्या जबाबदा-या निश्चित केल्या आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनीही पुणे शहराला महत्त्व दिले आहे. यामुळे १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यानंतर आता अमित शहा पुण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या दोन दिवसांच्या दौ-यात त्यांचा खूप वेळ राखीव असणार आहे.
भाजपने मिशन २०२४ ची तयारी सुरू केली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी वाटली गेली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांना दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे दिली गेली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांना दिली आहे. विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर या जबाबदा-या वाटल्या गेल्या होत्या.