ऑस्ट्रेलियाने पावसामुळे व्यत्यय आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सात विकेट्सने पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे सामना चार वेळा थांबवण्यात आला, त्यामुळे सामना प्रत्येकी 26 षटकांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मार्श व्यतिरिक्त, जोश फिलिपने 37 धावा केल्या, तर मॅट रेनशॉ 21धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने आठ आणि मॅथ्यू शॉर्टने आठ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली