मुख्यमंत्री शिंदेंच्या खुर्चीवर अजित पवारांना बसवले

आज मंत्रालयाजवळील मनोरा आमदार निवासाचे भूमिपूजन पार पडलं मात्र आजच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते आणि यामुळे राजकीय वर्तुळात खुसपुस सुरु झाली. त्यातून चर्चेला विषय म्हणजे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंचावर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्चीवर बसले. या व्हिडीओही चांगलाच चर्चेत आहे. 
 
मुख्यमंत्री आले नाही म्हणून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदेसाठी राखीव ठेवलेल्या खुर्चीवरील स्टीकर काढलं. मात्र हा सर्व घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद होऊन आता व्हायरल होत आहे.
 
या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोर्‍हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले नाहीत. अशात मंचावर मुख्यमंत्री शिंदेंसाठी ठेवण्यात आलेली खुर्ची रिकामी होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांसाठी ठेवलेल्या खुर्चीवर उपमुख्यमंत्री अजित पवार बसल्याचं पहायला मिळालं. 
 
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय हा नार्वेकरांच्या हातीच असल्यामुळे आणि त्यांनी हे शिंदेंच्या नावाचं स्टीकर काढल्याने याचे वेगळे अर्थही काढले जात आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती