Kojagiri Purnima 2025 कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजनाची पद्धत

शनिवार, 4 ऑक्टोबर 2025 (14:55 IST)
आश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून देखील साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी लक्ष्मी पूजन विशेष महत्त्वाचे मानले जाते. रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करते आणि आपल्या भक्तांवर कृपा करते. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या सौम्य प्रकाशात लक्ष्मी पूजन केले जाते. तर लक्ष्मी पूजनाची पारंपरिक पद्धत जाणून घेऊ या...
ALSO READ: कोजागरी पौर्णिमा 2025 : आश्विन पौर्णिमेला 'कोजागरी' का म्हणतात, महत्त्व जाणून घ्या
   लक्ष्मी पूजनाची तयारी-
सर्वात आधी घर आणि पूजा स्थळ स्वच्छ करा. मग स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. आता लक्ष्मी आणि गणेश मूर्ती किंवा चित्र, तांदूळ, हळद, कुंकू, फुले, फळे, पानसुपारी, खडीसाखर, दूध, मसाले दूध, तूप, दिवा, अगरबत्ती, कापूर, नाणे, आणि प्रसादासाठी मिठाई ही तयारी लावून घ्यावी.
तसेच कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. त्यासाठी दूध किंवा खीर तयार करावी.

पूजा स्थळ तयार करणे-
पूजा स्थळावर स्वच्छ लाल कापड पसरवा. मध्यभागी लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवा.  प्रथम गणेश पूजन करावे.आता तांदळाची रांगोळी काढा आणि त्यावर ताम्हण ठेवा. ताम्हणावर हळद-कुंकू लावून त्यात तांदूळ आणि नाणे ठेवा.

पूजा विधी संकल्प-
हातात तांदूळ, फूल आणि पाणी घेऊन पूजेचा संकल्प करा.आता गणेशाला हळद, कुंकू, फुले, आणि दूर्वा अर्पण करा. गणेश मंत्राचा जप करा: ॐ गं गणपतये नमः. तसेच लक्ष्मी मातेला हळद, कुंकू, फुले, पानसुपारी, आणि मिठाई अर्पण करा. लक्ष्मी मंत्राचा जप करा: ॐ श्री महालक्ष्म्यै नमः. आता तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून कापूर आरती करा. व लक्ष्मी आणि गणेशाला खीर, दूध, किंवा मिठाईचा नैवेद्य अर्पण करा.
ALSO READ: कोजागरी पौर्णिमेला रात्री गुपचुप 21 वेळा या मंत्राचा जप करा, चंद्राप्रमाणे भाग्य उजळेल !
चंद्रदर्शन पूजा-
रात्री चंद्र दिसल्यावर, एका तांब्यात किंवा भांड्यात दूध किंवा खीर घेऊन चंद्राला अर्पण करा. चंद्राला पाहताना पुढील मंत्र म्हणू शकता.
ॐ स्रां स्रीं स्रौं सः चंद्राय नमः.
चंद्राला अर्पण केलेले दूध किंवा खीर कुटुंबातील सर्वांना प्रसाद म्हणून वाटा. तसेच लक्ष्मी मातेची प्रार्थना करा. श्रीसूक्त, लक्ष्मी अष्टक, किंवा कनकधारा स्तोत्र यांचे पठन करू शकता. यानंतर घरात समृद्धी आणि सुख-शांतीसाठी प्रार्थना करा.

आरती आणि प्रसाद वाटप-
लक्ष्मी आणि गणेशाची आरती करा. लोकप्रिय आरती: ॐ जय लक्ष्मी माता. प्रसाद सर्वांना वाटा आणि कुटुंबासह चंद्राच्या प्रकाशात बसून या रात्रीचा आनंद घ्या. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करणे शुभ मानले जाते. काही लोक रात्रभर जागून भक्तीगीते, भजने किंवा कथा ऐकतात. पारंपरिकपणे, या रात्री दूध किंवा खीर बनवून चंद्राला अर्पण केले जाते.
ALSO READ: Kojagiri Purnima 2025 Wishes कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठीत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती