ठाकरे गटाला धक्का, पक्ष चिन्हाच्या याचिकेवर सुनावणी लांबणीवर

मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (17:04 IST)
ठाकरे गटाला सध्या धक्के बसत आहे. जून मध्ये 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड करून आपला वेगळा पक्ष उभारला आणि भाजपची साथ घेत राज्यात सत्ता स्थापित केली. आता ठाकरे गटाला धक्के जाणवत आहे. सध्या त्यांच्या पक्षातून आमदार, खासदार, नेते त्यांचा पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहे. तर आता सर्वोच्च न्यायालयाने पक्षाच्या चिन्ह आणि नावाच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी देण्यास नकार दिला आहे.   
 
जून मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर 40 आमदारांसह वेगळा पक्ष बनवला आणि पक्ष चिन्ह आणि पक्षाचे वेगळे नाव ठेवले. या गटाने खरी शिवसेना आमची असा दावा करत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्ष चिन्ह आणि पक्षच्या नावाची मागणी केली. केंद्रीय निवडणुकाने एकनाथ शिंदे यांना पक्षचिन्ह आणि पक्ष नाव दिले. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी निर्णयाचा विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि  शिवसेनाचे पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह ठाकरे गटाला मिळावे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची  आणि तातडीनं निर्णय देण्याची मागणी केली. मात्र आता सर्वोच्च न्यायालययाने तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 
 
Edited by - Priya Dixit   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती