मुंबई. लसीकरण केंद्रांना भेट देण्यास असमर्थ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी घरोघरी जाऊन कोविड-19 लसीकरण कार्यक्रम आयोजित करणे शक्य आहे का,अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने बुधवारी मुंबई महानगरपालिकेला केली.
सरन्यायाधीश दत्ता म्हणाले, "आपण ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला येणार का?केंद्र जरी घरो-घरी जाऊन लसीकरण देण्यास ग्रीन सिग्नल देत नसला तरी आम्ही आपल्याला मंजुरी देण्यास तयार आहोत." कोर्टाने विचारले की, बीएमसी अशा लोकांच्या घरात जाऊन सक्षम आहे की जे घराबाहेर पडू शकत नाही आणि त्यांना लसी देऊ शकत आहे का?
कोर्टाने महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांना गुरुवारी शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले व ते म्हणाले की या मध्ये त्यांना ज्येष्ठ नागरिक,दिव्यांगजन आणि अंथरुणावर किंवा व्हीलचेयर वर असलेल्या लोकांना योग्य वैद्यकीय सेवा देण्यासह त्यांना घरातच लसी देऊ शकत आहे किंवा नाही ?असे नमूद करायचे आहे.