‘या’ जिल्ह्यात म्युकर मायकोसिसमुळे 26 जणांचा मृत्यू

बुधवार, 19 मे 2021 (16:26 IST)
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच नव्या आजाराने तोंड वर काढले आहे. म्युकरमायकोसिस या नव्या आजारामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. डोंबिवलीमध्ये सुरुवातीला या आजारामुळे एक व्यक्ती मृत पावल्यानंतर हळूहळू मृतांचा आकडा वाढायला सुरुवात झाली आहे.
 
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आता या नव्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.  नागपूरमध्ये पहिला लाटेपासूनच कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. त्यातच नागपूरमध्ये आता म्युकरमायकोसिसने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. म्युकरमायकोसिस या आजारामुळे नागपूरमध्ये आतापर्यंत 26 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसच्या 600 पेक्षा जास्त रुग्णांवर आतापर्यंत नागपूरमध्ये उपचार करण्यात आले असल्याची माहिती डॉ. प्रशांत निखाडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती