तौक्ते : समुद्रातून सुटका केलेल्यांना घेऊन INS कोची मुंबईत दाखल (See Photos)

बुधवार, 19 मे 2021 (14:58 IST)
मुंबईजवळच्या समुद्रात बुडलेल्या P 305 बार्जवरच्या 184 जणांची सुटका करण्यात आली तर INS तेग, INS बेटवा, INS बिआस, P81 विमान आणि सी किंग हेलिकॉप्टर्स बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. बार्जवरून सुटका केलेल्यांनाना घेऊन नौदलाचं INS कोची जहाज मुंबईत दाखल झालंय. या जहाजावरून 14 मृतदेहही आणण्यात आले आहेत. ONGCचे अनेक कर्मचारी अजूनही बेपत्ता असून नौदलाची शोध मोहीम सुरू आहे.
तर नौदलाचं INS कोलकाता जहाज सुटका करण्यात आले्या इतर कर्मचाऱ्यांना घेऊन दुपारी दाखल होईल. P 305 बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते. बॉम्बे हाय जवळच्या समुद्रात ही बार्ज तौक्ते चक्रीवादळादरम्यान बुडली. या बार्जवरच्या 184 जणांची सुटका करण्यात आली आहेत.
सुटका करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा तपशील ONGC आणि Afcons कंपन्यांना देण्यात आला असून या बार्जवरच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना माहिती मिळावी म्हणून काही फोन नंबर्स देण्यात आले आहेत.
AFCONS हेल्पडेस्क :कुलदीप सिंग - +919987548113, 022-71987192प्रसून गोस्वामी - 8802062853ONGC हेल्पलाईन : 022-26274019, 022-26274020, 022-26274021
P 305 बार्ज ही भारतात तेल उत्पादन करणाऱ्या ONGC कंपनीची असून तौक्ते वादळाच्या तडाख्यामुळे या बार्जला समुद्रात रोखून धरणारे नांगर निघाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती