मुंबईमध्ये तौत्के चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला. त्यामुळे मुंबईकरांनी महापालिकेच्या विविध नागरी सेवासुविधांबाबतच्या १९१६ या हेल्पलाईनवर तात्काळ संपर्क करून तक्रारी दाखल करत मदतीसाठी सहकार्य मागितले. मुंबई महापालिकेच्या सीएसएमटी येथील मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयात फोन सकाळपासून रात्री उशिरापर्यंत खणखणत होता.
चणे, रस्ते, घरे आदी ठिकाणी झाडे, फांद्या कोसळणे, वाहतूक बंद पडणे, अंधेरी सब-वे या ठिकाणी पाणी साचणे, काही समुद्रात बोट दुर्घटना होणे आदी विविध स्वरूपाच्या घटनांबाबत या तक्रारी आल्या. पालिकेकडे तात्काळ मदतीसाठी दाद मागितली गेली.