ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर सुशील कुमार त्याच्या कनिष्ठ सागर धनखरच्या हत्येच्या आरोपाखाली बराच काळ तुरुंगात होता. या प्रकरणात त्याला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला. आता सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. कनिष्ठ कुस्तीगीर सागर धनखरच्या हत्येप्रकरणी सुशील कुमारचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे आणि अवघ्या १ आठवड्याच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आदेशही जारी केले आहेत.
सुशील कुमारला आत्मसमर्पण करावे लागणार
ज्येष्ठ कुस्तीगीर सागर धनखरच्या हत्येचा आरोप असलेल्या ऑलिंपिक सुशील कुस्तीगीरला दिल्ली उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. जो रद्द करण्याची मागणी सागरच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मे २०२१ मध्ये दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये ज्यष्ठ कुस्तीगीर सागर धनखरची मारहाण करून हत्या करण्यात आली. सागरचे वडील अशोक धनखर यांनी आरोपी सुशील कुमारचा जामीन रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती.
मृत कुस्तीगीर सागर धनकरच्या वडिलांचा दावा आहे की, आरोपी कुस्तीगीर सुशील कुमार जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने साक्षीदारांवर दबाव आणला होता. यावेळीही असेच घडण्याची शक्यता आहे. अशोक धनकर यांचा आरोप आहे की, आता पुन्हा त्यांच्या कुटुंबावर तडजोड करण्यासाठी दबाव आणला जात आहे. या प्रकरणाचे व्हिडिओ पुरावे देखील आहेत, ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आहे.
सुशील कुमारविरुद्ध अनेक कलमांखाली खटला दाखल
खरं तर हे प्रकरण ५ मे २०२१ च्या रात्रीचे आहे. जेव्हा माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीगीर सागर धनकरला दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लाठ्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे सागरचा रुग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय, या प्रकरणात आणखी ४ कुस्तीगीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात एकूण १३ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध गुन्हेगारी कट, अपहरण, दरोडा, दंगल, हत्येचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.