मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी किमान सहा नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी दुपारी अबुझमद परिसरातील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. परिसरात नक्षलवाद्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई सुरू केली.
मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त
बस्तर प्रदेशाचे पोलिस महानिरीक्षक म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमद भागात माओवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांना नक्षलविरोधी कारवाईसाठी पाठवण्यात आले होते. या कारवाईदरम्यान आज दुपारपासून सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये अधूनमधून चकमकी सुरू आहे. त्यांनी सांगितले की, शोध मोहिमेदरम्यान आतापर्यंत चकमकीच्या ठिकाणी सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह, एके-४७ आणि एसएलआर रायफल, इतर अनेक शस्त्रे, स्फोटके आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहे.