मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले की, नक्षलग्रस्त नारायणपूर-बिजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २५ हून अधिक नक्षलवादी ठार झाले.
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. तसेच आतापर्यंत २० माओवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या कॅडर नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर ही चकमक सुरू आहे.