पावसाळ्याच्या दिवसात या 5 प्रकारच्या चविष्ट पुरी अवश्य ट्राय करा, लिहून घ्या रेसिपी

मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (06:36 IST)
पावसाळ्यात गरम आणि चटपटीत पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. या दिवसांमध्ये लोक गरम गरम भजे, पकोडे आवडीने खातात. तसेच अनेक जणांना पुरी खूप आवडते. म्हणून आज आपण पाच प्रकारच्या पुऱ्या पाहणार आहोत. तसेच तुम्ही नाश्ता किंवा स्नॅक्स मध्ये देखील खाऊ शकतात. तर चला लिहून घ्या पाच प्रकारच्या पुरी रेसिपी.
 
1.डाळ पुरी रेसिपी-
हरभरा डाळ दोन ते तीन तास भिजत घालून शिजवून घ्या. आता मिक्सरमधून बारीक करून घ्या.
कढईमध्ये तेल घालून जिरे आणि हिंग घालावे. 
त्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची घालून परतवून घ्यावे. 
आता यामध्ये डाळ, हळद, धणेपूड, मीठ घालून परतवून घ्यावे. 
आता पिठामध्ये मीठ आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावे. 
आता या पीठाचे गोळे करून त्यामध्ये ही डाळ भरावी. व छोट्या आकारात लाटून घ्यावे. तेल गरम करून छान तळून घ्यावे. 
 
2. बटाटा पुरी रेसिपी-
एका परातीत पीठ, मॅश केलेला बटाटा, हिरवी मिरची, जिरे, काळे मीठ, मीठ, हळद, धणे पूड आणि हिरवी कोथिंबीर मिक्स करावी. आता हे पीठ मालवून घ्यावे. व गोळे बनवून पुरी टाळून घ्यावी. आता एका कढईमध्ये तेल गरम करून पुरी खरपूस तळून घ्यावी. 
 
3. पनीर पुरी रेसिपी-
एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, रवा, जिरे, धणे पूड, गरम मसाला आणि मीठ मिक्स करावे. यामध्ये पनीर किसून घालावे व हिरवी मिरची घालावी. थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. तसेच 10 मिनिट भिजू द्यावे. आता गोळे बनवून पुरी लाटून घ्यावी व तेलात तळून घ्यावी.
 
4. मूग डाळ पुरी रेसिपी-
मुगाच्या डाळीला 1-2 तास भिजत ठेवावे. मग जाडसर दळून घ्यावी. आता पीठ घेऊन त्यामध्ये मीठ, जिरे, आले आणि हिरवी मिरची घालून तयार करावे. आता पाणी घालून कणिक मळून घ्यावी. आता गोळे तयार करून त्यामध्ये हे मिश्रण भरावे. व पुरी लाटून घ्यावी. कढईमध्ये तेल गरम करून छान खरपूरस तळून घ्या.
 
5. सातूची पुरी रेसिपी-
एका बाऊलमध्ये सत्तूचे पीठ, हिरवी मिरची, आले, जिरे, हळद, धणे पूड आणि मीठ घालावे. तसेच एका बाऊलमध्ये पीठ घेऊन त्यामध्ये गरम पाणी घालावे व मळून घ्यावे. आता छोटे गोळे करून त्यामध्ये सातूचे बनवलेले मिश्रण भरावे. व लाटून घ्यावी. व कढईमध्ये तेल गरम करून तळून घ्या.
 
तुम्ही या पाच प्रकारच्या पुरी लोणचे, चटणी, भाजी यांसोबत देखील सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती