कृती-
सर्वात आधी अंजीर कोमट पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. भिजल्यानंतर ते मिक्सर जारमध्ये ठेवा आणि पेस्ट बनवा. आता एका पॅनमध्ये दूध गरम करा. नंतर त्यात मखाना आणि राजगिरा घाला, आता अंजीर कुस्करून मिक्स करा. त्यानंतर सुकामेवा आणि वेलची पावडर घाला. आता ते थोडे उकळू द्या आणि नंतर साखर किंवा गूळ घाला आणि गॅस बंद करा. आता तयार खीर एका बाऊलमध्ये काढा. तर चला तयार आहे नैवेद्याची अंजीर खीर रेसिपी.