घरी आलेल्या पाहुण्यांसाठी चविष्ट दहीभल्ला बनवा, जाणून घ्या रेसिपी

शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (14:56 IST)
दही भल्ला ही एका अशी डिश आहे जी सर्वांना आवडते, तसेच घरी पाहुणे आले आहे, अश्यावेळेस काय करावे वेगळे सुचत नसेल तर नक्की ट्राय करा. दहीभल्ला घरीसुद्धा लागलीच बनून तयार होते. तर चला लिहून घ्या दहीभल्ला रेसिपी 
 
साहित्य-
उडदाची डाळ - 300 ग्राम
किशमिश- 30
दही फेटलेले-6 कप
तिखट 
चवीनुसार मीठ 
जिरे पूड 
गोड चटणी 
2 चमचे काजू बारीक कापलेले 
2 चमचे बदाम बारीक कापलेले 
2 चमचे किशमिश 
चिंचेची आंबटगोड चटणी 
 
कृती-
सर्वात आधी रात्री भिजत घातलेली उडिदाची डाळ घ्यावी व ती बारीक करून तिची पेस्ट करावी. आता एका बाऊलमध्ये काजू, बदाम, किशमिश मिक्स करून या पेस्ट मध्ये घालावे. 
 
यानंतर भल्ले बनवून आपल्या आवडीप्रमाणे आकार द्यावा. तसेच गोल्डन-ब्राऊन कलर येईसपर्यंत तेलात टाळून घ्यावे. आता यांना प्लेट मध्ये काढून कोमट पाण्यामध्ये दहा मिनिटांसाठी घालावे. 
 
10 मिनट नंतर भल्ले पाण्यामधून काढून त्यांना दाबून त्यांच्यातील पाणी काढावे. तसेच वरतून दही, मीठ, तिखट, जिरे पूड, गोड चटणी, चिंचेची चटणी टाकून सर्व्ह करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती