फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होतो पापड पिज्जा, जाणून घ्या रेसिपी

रविवार, 4 ऑगस्ट 2024 (07:00 IST)
सर्वांना पापड खूप आवडतात. कोणाला तळलेले पापड आवडतात तर कोणाला भाजलेले पापड आवडतात. तसेच पापड जेवणाची चव वाढवत असतो. तुम्हाला माहित आहे का आपण पापड पासून पिज्जा देखील बनवू शकतो. तर चला लिहून घ्या पापड पिज्जा रेसिपी.
 
साहित्य-
पापड
चीज
कांदा 
टोमॅटो 
पिज्जा सॉस
सिमला मिरची 
कॉर्न
ओरेगेनो
चिली फ्लेक्स
चवीनुसार मीठ 
 
कृती-
पापड पिज्जा बनवण्यासाठी सर्वात आधी पहिले पापड घेऊन त्याला पिज्जा सॉस लावून घ्या.
यानंतर यामध्ये चीज घालावे. 
आता कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरचीचे थोडया मोठ्या आकाराचे तुकडे कापून घ्यावे.
कापलेल्या भाज्या आणि कॉर्न पापडावर घालावे.
आता यावर चिली फ्लेक्स, ओरेगेनो आणि चवीनुसार मीठ घालावे.
आता यावर वारीं परत चीज घालावे.
आता एका पॅनमध्ये ठेवावे व झाकण लावून शिजवण्यास ठेवावे. 
तसेच लक्षात असू द्या की लहान गॅस ठेवावा.  
तर चला तयार आहे आपला पापड पिज्जा. आता याला स्लाइस मध्ये कापून सर्व्ह करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती