1/4 कप पत्ता कोबी चिरलेली
1 छोटा चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची
2 मोठे चमचे मॅगी टेस्ट मेकर
15 छोटे पनीरचे तुकडे
तळण्यासाठी तेल
कृती-
मॅगी चीज बॉल्स बनवण्यासाठी सर्वात आधी स्लरी तयार करून घ्या. एक मोठ्या बाऊलमध्ये तीन मोठे चमचे मैदा, तीन मोठे चमचे कॉर्नफ्लोर, एक मोठा चमचा मॅगी टेस्ट मेकर, मीठ, अर्धा काप पाणी घालावे. ह्या सर्व वस्तू एकत्रित करून घोळ तयार करून घ्या.
आता दुसऱ्या बाऊलमध्ये उकळलेले मॅगी नूडल्स, कांदा, शिमला मिरची, पत्ता कोबी, हिरवी मिरची, मॅगी टेस्ट मेकर, हळद, मैदा, कॉर्नफ्लोर, चवीनुसार मीठ मिक्स करावे. आता या मिश्रणाचे बॉल्स तयार करून त्यामध्ये पनीरचे तुकडे ठेऊन परत बॉल्स बंद करावे.