साहित्य : मक्याच्या दाण्यांचा कीस 2 वाट्या, हिरवी मिरची 25 ग्रॅम, लसूण 5-6 पाकळ्या, आले, जिरे, शोप, हळद, लाल मिरची, मीठ, कोथिंबीर, तेल, ब्रेड 12 स्लाइस.
कृती : आले-लसूण, हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घ्या. एक चमचा तेल गरम करा. त्यात जिरे, शोप टाका. त्यात मक्याचा कीस, लाल मिरची, हळद आणि मीठ टाका. थोडे भाजून घ्या. हिरवी मिरची आणि आल्याचा तयार केलेला मसाला टाका. कोथिंबीर टाका. गार झाल्यावर दीड इंचाएवढे लांब रोल बनवा.