अभिनेता सलमान खानला सापाने दंश केला , उपचारानंतर अभिनेत्याची प्रकृती ठणठणीत

Webdunia
रविवार, 26 डिसेंबर 2021 (12:22 IST)
अभिनेता सलमान खानला शनिवारी सापाने दंश केला. काल रात्री सलमानला त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर साप चावला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर रात्री 3 वाजता अभिनेत्याला कामोठे येथे दाखल करण्यात आले. उपचारानंतर सलमानलाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. सकाळी 9 वाजता सलमान त्याच्या फार्म हाऊसवर परतला. त्यांची प्रकृती आता ठणठणीत असल्याचे सांगण्यात येत आहे. ख्रिसमस साजरा करण्यासाठी सलमान कुटुंब आणि मित्रांसह त्याच्या फार्म हाऊसवर गेले होते. विशेष म्हणजे हा परिसर डोंगर आणि जंगलाने वेढलेला आहे. या संकुलात अनेकदा साप, अजगर दिसतात.

संबंधित माहिती

पुढील लेख