Maharashtra Tourism : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून इथे अनेक संत आणि महिला संत होऊन गेलेत. ज्यांनी विठूरायाची भक्ती शिकवून समाजात एक आदर्श निर्माण केला. या सर्व संतांमध्ये एक महिला संत म्हणजे संत मुक्ताबाई होय. 13 व्या शतकातील गूढ कवयित्री संत मुक्ताबाई या मध्ययुगीन भारतातील भक्ती चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होत्या. तसेच संत मुक्ताबाई महान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भगिनी होत्या. संत मुक्ताबाईं यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे ई.स. 1279 साली झाला. यांचा वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. मुक्ताबाई यांना ''मुक्ताई नावाने ओळखल्या जातात. तसेच निवृतीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संत मुक्ताबाई वारकरी परंपरेच्या एक अत्यंत लोकप्रिय संत आहे.
तसेच संत मुक्ताबाईंचे जीवन आणि कविता काळ आणि अवकाशाच्या सीमा ओलांडून पिढ्यांना प्रेरणा देत राहतात. मुक्ताबाई ह्या नाथसंप्रदायातील सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या पहिल्याच स्त्री-सद्गुरू होत्या. संत मुक्ताबाईचे ताटीचे अभंग रचले आहे. संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहे. संत मुक्ताबाईं तेजस्वी आध्यात्मिक जागृती आणि आंतरिक शांतीच्या मार्गावर प्रकाश टाकणारा मार्गदर्शक तारा म्हणून चमकत राहते! तसेच वैशाख वद्य दशमी या दिनी मुक्ताबाई तापीतीरी स्वरूपाकार झाल्या. 12 मे 1297 रोजी ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या. मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे.
संत मुक्ताबाई समाधी मंदिर जावे कसे?
जळगाव शहर हे अनेक प्रमुख शहरांशी रस्ता मार्गाने आणि रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. जळगाव शहरात पोहचल्यानंतर येथून मुक्ताईनगर करीता अनेक परिवहन मंडळाच्या बस चालतात. मुक्ताईनगर येथे पोहचल्यानंतर सहज मंदिरापर्यंत पोहचता येते.