दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामचा विक्रम मोडला, 1.9 अब्ज व्ह्यूज मिळवले

शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 (21:04 IST)

दीपिका पदुकोणने इंस्टाग्रामवर इतिहास रचला आहे. तिच्या एका रीलवर 1.9 अब्ज व्ह्यूज मिळवून तिने इंस्टाग्रामच्या जगात एक नवीन टप्पा गाठला आहे आणि आता ती रीलच्या जगताची राणी बनली आहे. या कामगिरीमुळे तिला सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओचा किताब मिळाला आहे..तिच्या एका प्रमोशनल रील्सने या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिलेला व्हिडिओचा किताब जिंकला आहे,

ALSO READ: Bigg Boss 19: सलमान खानच्या बिग बॉसच्या इतिहासात दुसऱ्यांदा तृतीयपंथी स्पर्धक प्रवेश करणार

ही रील 9 जून रोजी हॉटेल चेन हिल्टनसोबत पेड पार्टनरशिप अंतर्गत पोस्ट करण्यात आली होती. हिल्टन हिल्टनच्या "इट मॅटर्स व्हेअर यू स्टे" या जागतिक मोहिमेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. या रीलने अवघ्या दोन महिन्यांत ही कामगिरी केली आहे.

ALSO READ: अभिनेता धनुष 'या' मराठी अभिनेत्रीला करतोय डेट! व्हिडिओ व्हायरल

यापूर्वी, सर्वाधिक पाहिले गेलेल्या रीलमध्ये हार्दिक पंड्याचा बीजीएमआय पार्टनरशिप व्हिडिओ (1.6 अब्ज व्ह्यूज) आणि स्मार्टफोनचा प्रमोशनल व्हिडिओ (1.4 अब्ज व्ह्यूज) यांचा समावेश होता.

ALSO READ: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यजीने ट्रोलर्सविरुद्ध खटला दाखल केला

पण आता रील नॉर्मल ब्रँड कोलॅबोरेशन असूनही, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याला सर्वाधिक एंगेजमेंट मिळाली आहे.दीपिका पदुकोणच्या या सोशल मीडिया यशानंतर, तिला अलीकडेच हॉलिवूड चेंबर ऑफ कॉमर्सकडून मान्यता मिळाली आहे, ज्याने 2026 मध्ये हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये तिला स्टार मिळण्याची घोषणा केली आहे.

Edited By - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती