पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

सोमवार, 25 नोव्हेंबर 2024 (07:30 IST)
पंच कैलास तीर्थयात्रा जीवनात एकदा तरी करावी. तसेच ही पंच कैलास यात्रा हिंदू धर्माच्या पाच सर्वात पवित्र शिखरावर घेऊन जाते.  
 
Panch Kailash Yatra : या जगामध्ये पाच कैलासाची उपस्थिती मनाली जाते. ज्यांचे शिव भक्तांमध्ये  विशेष महत्व आहे. हे पंच कैलास आहे, कैलास पर्वत, आदि कैलास, मणिमहेश, श्रीखंड महादेव आणि किन्नर कैलास. जाणून घ्या या पंच कैलास बद्दल. 
 
कैलास पर्वत-
भगवान शंकरांचे निवास्थान असलेला प्रसिद्ध कैलास पर्वत तिबेट देशात स्थित आहे. पांच कैलास पर्वतांमध्ये हा पर्वत 6638 मीटर उंच आहे. पौराणिक आख्यायिकांनुसार भगवान शिव इथे राहायचे. शिवपुराण, स्कंद पुराण, मत्स्य पुराण इतर मध्ये कैलास खंड नावाने वेगवेगळे अध्याय आहे. पौराणिक मान्यता नुसारयाजवळच कुबेर नगरी आहे. तसेच कैलास पर्वताच्या वरती स्वर्ग आणि खाली मृत्यलोक आहे. कैलास पर्वताजवळ मानसरोवर आणि रक्षास्थळ स्थित आहे. कैलास पर्वत कमीतकमी 6600 मीटर पेक्षा देखील उंच आहे. पण आज पर्यंत कोणीही कैलास पर्वतावर चढू शकलेले नाही. तसेच मानसरोवरची यात्रा करणारे भाविक दुरूनच कैलास पर्वताचे दर्शन घेतात.  
 
आदि कैलास-
आदि कैलास, ज्याला छोटा कैलास आणि शिव कैलास देखील म्हणतात. हा पर्वत भारत-तिबेट सीमेच्या  जवळ भारतीय सीमा क्षेत्रामध्ये स्थित आहे. आदि कैलासला कैलास पर्वताची एक प्रतिकृती देखील मानले जाते. हा पर्वत समुद्रतळापासून कमीतकमी 5,945 मीटर आहे. तसेच अशी धार्मिक मान्यता आहे की,  महादेव जेव्हा माता पार्वतीसोबत विवाह करण्यासाठी वरात घेऊन आले होते तेव्हा ते इथेच थांबले होते.   तसेच हा पर्वत शिवभक्तांसाठी लोकप्रिय स्थान आहे. या पर्वतात कैलास पर्वताचे छयाचित्र दिसते. तसेच येथील सरोवराच्या किनाऱ्यावर माता पार्वती आणि महादेवाचे सुंदर असे मंदिर आहे.  
 
किन्नर कैलास-
किन्नर कैलास हिमाचल प्रदेश मधील किन्नौर जिल्ह्यामध्ये स्थित आहे.हा पर्वत कमीतकमी 6050 मीटर उंच आहे. पौराणिक मान्यतानुसार किन्नर कैलास जवळ देवी पार्वती द्वारा निर्मित एक सरोवर आहे. ज्याला त्यांनी पूजेकरिता बनवले होते. याला पार्वती सरोवर नावाने देखील ओळखले जाते.   स्थानीय लोगों के अनुसार इस पर्वत की चोटी पर एक पक्षियों का जोड़ा रहता है. इथे हिवाळ्यात बर्फ पडतो.पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की हा पर्वत कधीच बर्फाने झाकला जात नाही. इथे नैसर्गिकरित्या ब्राम्हकमळ उगवते. तसेच किन्नर कैलास पर्वतावर असलेले नैसर्गिक शिवलिंग दिवसभरात अनेक वेळेस आपले रंग बदलते.  
 
मणिमहेश कैलास-
मणिमहेश कैलास हिमाचल प्रदेश मधील चंबा जिल्ह्यामध्ये स्थित आहे.हा पर्वत कमीतकमी 5653 मीटर उंच आहे. हिमालयातील धौलाधर, पांगी आणि झांस्कर रांगांनी वेढलेला कैलास पर्वत मणिमहेश कैलास या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच मणिमहेश कैलास पर्वताजवळ मणिमहेश सरोवर आहे. पौराणिक मान्यतेनुसार महादेवांनी माता पार्वतीशी विवाह पूर्व हा पर्वत निर्माण केला होता. श्री कृष्ण जन्माष्टमी (भाद्रपद कृष्ण अष्टमी) ते भाद्रपद शुक्ल अष्टमी पर्यंत लाखो भाविक पवित्र मणिमहेश सरोवरात  स्नान करून कैलास पर्वताच्या दर्शनासाठी येथे पोहोचतात. 
 
श्रीखंड कैलास-
श्रीखंड कैलास हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यामध्ये स्थित आहे. समुद्रतळापासून हा पर्वत कमीतकमी 5227 मीटर उंचावर आहे. पौराणिक मान्यतानुसार इथे भगवान विष्णूंनी महादेवांकडून वरदान प्राप्त असलेल्या भस्मासुराचा नृत्याच्या मदतीने वध केला होता. श्रीखंड कैलासाची यात्रा खूप कठीण मनाली जाते. पण अनेक भक्त इथे कठीण यात्रा पार करून पोहचतात.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती