मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचे पती राज कुंद्रा यांच्यानंतर, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आता शिल्पा शेट्टी यांची सखोल चौकशी केली आहे. व्यापारी दीपक कोठारी यांनी शेट्टी आणि कुंद्रा यांच्यावर ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक शिल्पा शेट्टीच्या निवासस्थानी पोहोचले, जिथे सुमारे साडेचार तास चौकशी चालली.