विनोदी अभिनेत्री भारती सिंगने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर तिचा पती हर्ष लिंबाचियासोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने दुसऱ्यांदा आई होण्याची आनंदाची बातमी दिली आहे. भारतीने या आनंदाच्या बातमीसह पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली आणि चाहते आणि सेलिब्रिटीही शुभेच्छा देत आहे.
भारती सिंगने यापूर्वी अनेक वेळा मुलगी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारती सिंग सध्या तिच्या कुटुंबासह स्वित्झर्लंडमध्ये सुट्टी घालवत आहे. तिथून, तिने तिच्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली. तिने "गोला मोठा भाऊ होणार आहे" शीर्षकाचा एक गोंडस व्हीलॉग देखील पोस्ट केला.