अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन

मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 (13:27 IST)
Photo- Instagram
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अभिनेत्रींच्या अगदी जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. सोनालीच्या चुलत भावाचं निधन झाल्याची बातमी तिने सोशल मीडियावर दिली. भावाच्या निधनाने सोनालीच्या घरात शोककळा पसरली आहे. 
ALSO READ: मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे अडकला लग्न बंधनात
अभिनेत्री ने इंस्टाग्रामवर पोस्ट करत ही दुःखद बातमी शेअर केली आहे. तिने भावाच्या आठवणीतील खास क्षण देखील शेअर केले आहे. तिने लिहिले आहे "आमचा अन्नूमा हे जग सोडून निघून गेलास, तुझ्या आत्म्याला शांती मिळो. जिथे असशील तिथे वेदनारहित आयुष्य मिळो.
ALSO READ: बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणेला अटक
तू सर्वात निर्मल मनाचा व्यक्ती होतास तुझे प्रत्येकासोबत चांगले नाते होते. तू सगळ्यांवर निस्वार्थ प्रेम केले.सगळी गाणी तुला माहित होती. तबला तू छान वाजवायचा. तुझ्या हातचा चहा. तू सगळ्यांना भरभरून प्रेम दिलसं. आम्ही नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहू ओम शांती.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिल्या आहे. तिला हे दुःख सहन करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केल्या आहेत. 
Edited By - Priya Dixit
 
ALSO READ: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अथर्व सुदामे अडचणीत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती