सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्यात ब्रेकअप

शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (11:51 IST)
बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा प्रियकर रोहमन शॉल यांच्या नात्यात ब्रेकअप झाल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या. दरम्यान, सुष्मिता सेनने रोहमन शॉलसोबतच्या तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने पुष्टी केली आहे की ते आता एकत्र नाहीत. त्यामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुष्मिता सेनने गुरुवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती रोहमल शालसोबत दिसत आहे. सुष्मिता सेनने या फोटोसोबत केले आहे, 'आमचे नाते मैत्रीपासून सुरू झाले, आम्ही मित्रच राहू. नातं फार पूर्वी संपलं, प्रेम अजून आहे .'
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल 2018 पासून एकमेकांना ओळखतात. रोहमन शॉलची  लवकरच सुश्मिताच्या मुली आणि पालकांशी जवळीक झाली. रोहमन अनेकदा सुष्मिता सेनच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आणि सुट्टीच्या ठिकाणी दिसत असे .
या पूर्वी, सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले होते की, दोघांनीही त्यांचे नाते संपवले आहे. रोहमन शॉल आता सुष्मिता सेनच्या घरीही राहत नाही. तो आपले घर सोडून मित्राच्या घरी शिफ्ट झाला आहे.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुष्मिता सेनने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने बिघडलेल्या नात्यातून बाहेर पडण्याबद्दल लिहिले होते. यानंतर चाहत्यांनी अंदाज लावला की तिचा रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाला आहे का? मात्र, या जोडप्याने सार्वजनिकरित्या सांगून  या अफवेला पूर्णविराम दिला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती