भारतातील पाच असे स्थळ जिथे अप्रतिम सुपरमून दिसतो

सोमवार, 6 ऑक्टोबर 2025 (07:30 IST)
India Tourism : भारताला अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. तसेच प्राचीन असो किंवा ऐतिहासिक असो किंवा आधुनिकत्यामुळे भारतात अनेक पर्यटन स्थळे आहे. तसेच तुम्हाला माहित आहे का?  की भारतात असे देखील काही पर्यटन स्थळे आहे जिथे पौर्णिमेला सुपरमून म्हणजे मोठ्या आकारात चंद्राचे अद्भुत दर्शन घडते. तसेच तुम्ही तुमच्या जोडीदाराला अशा ठिकाणी नक्कीच घेऊन जा की जिथे चंद्र जास्त सुंदर दिसतो. तर चला जाणून घेऊन या भारतातील असे काही स्थळे जिथे सुपरमूनचे अद्भुत दृश्य पाहवयास मिळते.  
  
मरीन ड्राइव्ह-
मुंबईमधील मरीन ड्राइव्हवर समुद्राच्या पाण्यावर पडणाऱ्या चंद्र चांदण्यांचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक अनेकदा तिथे जातात. सुपरमून पाहायचा असल्यास तुम्ही मरीन ड्राइव्हला नक्कीच जाऊ शकता, तेथून चंद्राचे सुंदर दृश्य दिसते. येथे तुम्ही अरबी समुद्राचे सुंदर दृश्य देखील पाहू शकता, जे पाहून तुमचा जोडीदार खूश होईल.
ALSO READ: मथुरा जवळील काही रोमँटिक ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर करू शकता
उत्तराखंड-
चंद्रशिला, गढवाल हिमालयाचे शिखर, उत्तराखंडमध्ये 4,000 मीटर उंचीवर आहे. ट्रेकिंगचे ठिकाण असल्याने इथपर्यंत पोहोचणे थोडे अवघड आहे, पण बर्फाच्छादित शिखरांसह येथील दृश्य अतिशय सुंदर आहे. तुमच्या जोडीदारासोबत सुपरमून पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच जाऊ शकतात.  
 
कन्याकुमारी-
तामिळनाडू मधील कन्याकुमी हे शहर आहे जिथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य अतिशय सुंदर आहे. यासोबतच रात्री चांदणे आणि सुपरमूनचे दृश्यही सुंदर दिसते. तुम्ही तुमच्या जोडीदाराला इथे सुपरमून पाहण्यासाठी नक्कीच आणू शकता.
 
मनाली-
मनाली आपल्या सुंदर प्रेक्षणीय स्थळांसाठी ओळखले जाते, मनाली येथील चंद्र देखील खूप सुंदर दिसतो. मनालीतील पर्वतांच्या मधोमध हॉटेलच्या बाल्कनीतून चंद्र अप्रतिम दिसतो. असे दृश्य तुम्हाला मोहित करेल. तुम्ही तुमच्या जोदीरासोबत येथे रोमँटिक सहलीचा आनंद घेऊ शकतात.
ALSO READ: Best Pre-Wedding Trip: भारतातील ही ठिकाणे प्री वेडिंग करिता आहे परिपूर्ण
पुष्कर-
पुष्कर सरोवर अनेक मंदिरांनी वेढलेले आहे. हे राजस्थान राज्यातील अजमेर जिल्ह्यातील पुष्कर शहरात आहे. श्री ब्रह्माजींनी हे सरोवर बांधले होते आणि तलावाजवळ श्री ब्रह्माजींचे मंदिर देखील आहे. इथून चंद्र खूप सुंदर दिसतो. तुम्ही येथे जाऊन सुपरमूनचे दृश्य देखील पाहू शकतात. 
ALSO READ: भारतातील अद्भुत ठिकाणे जी रात्री अंधारात तेजोमय दिसतात

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती