तन्वी द ग्रेटमध्ये एक मोठी स्टारकास्ट दिसणार आहे. ज्याबद्दल माहिती आधीच देण्यात आली आहे. या चित्रपटात तन्वीच्या भूमिकेत शुभांगी दत्त व्यतिरिक्त, बोमन इराणी, इयान ग्लेन, जॅकी श्रॉफ, नासेर, पल्लवी जोशी, करण ठक्कर आणि अरविंद स्वामी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. 'तन्वी द ग्रेट'ची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.