अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या चर्चेनंतर, त्यांचे नाते सुरू होण्याआधीच संपुष्टात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहिती समोर आली आहे की, सिद्धांतनेच हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप कळलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार काही आठवड्यांपूर्वी अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा यांच्यातील अफेअरच्या बातम्या मनोरंजन वर्तुळात चर्चेत होत्या. त्यांच्या नात्याबद्दल सर्वत्र चर्चा होती. आता याची पुष्टी झाली असली तरी, एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. असे म्हटले जात आहे की त्यांचे प्रेम फुलण्याआधीच संपले. त्या जोडप्याचे ब्रेकअप झाले सूत्रांनी सांगितले की, 'त्यांचे अलिकडेच ब्रेकअप झाले आहे. सिद्धांतनेच ते संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबियांना भेटले होते. पण, त्यांच्या ब्रेकअपचे कारण कळू शकले नाही. प
सारा तेंडुलकरचे नाव यापूर्वी क्रिकेटर शुभमन गिलशीही जोडले गेले होते. पण भारतीय फलंदाजाने ती अफवा असल्याचे म्हटले होते आणि म्हटले होते की तो त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे आणि कोणाशीही डेट करत नाही. याशिवाय सिद्धांत चतुर्वेदीचे नाव अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदासोबत जोडले गेले. दोघांनाही अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. पण दोघेही गेल्या वर्षीच वेगळे झाले.