रामदास कदम यांनी सरकार अस्थिर करण्याचं काम केलं, मनसे नेत्याचा आरोप

Webdunia
रविवार, 19 सप्टेंबर 2021 (10:33 IST)
शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केलं आहे,असा गंभीर आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
 
या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेत पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांची सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे.
 
रामदास कदम यांचे मित्र किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांची देखील बेनामी संपत्तीची माहिती जगासमोर आणावी, असं आव्हान खेडेकर यांनी सोमय्या यांना दिलं आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख