नरेंद्र मोदी यांचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण जास्त आवडतो - प्रीतम मुंडे
रविवार, 19 सप्टेंबर 2021 (10:02 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आतापर्यंत एकही पत्रकार परिषद न घेण्याचा गुण मला सर्वाधिक आवडतो, असं प्रतिपादन बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केलं आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान प्रीतम मुंडे बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, "पंतप्रधान मोदी यांचा मला सगळ्यांत आवडणारा गुण म्हणजे त्यांनी गेल्या 7 वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. याविषयी त्यांच्यावर टीका झाली. पण जो माणूस आपलं काम करतो, तो आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत राहतो.
"कोणत्याही व्यक्तीबाबत चांगलं बोलणारे 10 जण असले तर टीका करणारे 2 जण असतात.आपण विचलित न होतं आपलं काम करत राहणं महत्त्वाचं असतं,असं त्या म्हणाल्या.