कोल्हापूर : गांधीनगर ता.करवीर मुख्य रस्त्यावर उचगाव हद्दीतील मळ्यात सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री एक वाजता गांधीनगर पोलिसांनी धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह त्यामध्ये १३ मोबाईल, ६ मोटर सायकल व रोख रक्कम ५२०००/- रुपये असा सहा लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
यावेळी खेळणाऱ्या सतरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा व कलम ४ व ५ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणी गांधीनगर परिसरात पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे यांनी फिर्याद दिली.
गांधीनगर मुख्य रस्त्यावर उचगाव हद्दीतील मळ्यातील एका बंद वाड्यात तीन पानी जुगार अड्डा असल्याची माहिती गांधीनगरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांना मिळाली. गुरुवारी मध्यरात्री रात्री एक वाजता सपोनी अर्जुन घोडे पाटील यांनी तीन पानी जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी तीन पानी जुगार खेळणाऱ्या सतरा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील एकुण ६,०५२००/- रुपयांचा मुददेमाल, त्यात रोख रक्कम ५२०००/- रुपये तसेच जुगाराचे साहित्यासह मुददेमाल विना परवाना बेकायदा तीन पाणी पत्याच्या जुगारावर पैसे लावुन जुगार खेळत असताना मिळुन आल्याने कारवाई करण्यात आली.संशयित आरोपींचे नाव व पता खालील प्रमाणे,