मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले बारा प्रवासी रविवारी रत्नागिरी-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचेगावजवळ झालेल्या अपघातात जखमी झाले. चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. ही जीप खैरवाडहून पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होती. रविवारी रात्री वाजताच्या चालक यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावर आदळली. या अपघातात गाडीतील सर्व जणांना दुखापत झाली. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. अशी माहिती समोर आली आहे.