जनतेला त्रास होईल असे आंदोलन करू नये देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Webdunia
शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (10:05 IST)
मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिले आहे. त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असे आंदोलन करू नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने दिलेले आरक्षण मान्य नसल्याने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारीपासून राज्यभरात आंदोलन सुरू होणार आहे.
 
दरम्यान, या आंदोलनावरुन कायदेशीर लढाई सुरू झाली असून उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये, न्यायालयाने जरांगे यांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, भूमिका स्पष्ट करण्याचेही न्यायालयाने बजावले आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

पुढील लेख