नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात बंदीची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (10:00 IST)
नाशिकरोड : पत्नी ची हत्या करून कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगणाऱ्या बंदीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी सांगितले की, त्रंबकेश्वर येथील देव डोंगरा येथील शांताराम जानू वड (वय 42)या तरुणाने पत्नीची हत्या केली होती.त्रंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलीस कोठाडी नंतर त्याची  2 फेब्रुवारी 2024रोजी न्यायलयीन कोठाडीत न्यायालयाच्या आदेशाने नाशिकरोड मध्यवर्ती कारगृहात दाखल केले.
 
न्यायलयीन कोठाडी भोगत असतांना शांताराम वड या तरुण बंदी ने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

पुढील लेख