आधी ते शिवसेनेत होते नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातून ते भाजपचे आमदार होते. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. पाटणींच्या निधनाने भाजपसह राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. राजेंद्र पाटणी हे 1997 ते 2003 या काळात शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार होते. त्यानंतर 2004 (शिवसेनेकडून), तर 2014 आणि 2019 मध्ये भाजपकडून असे तीन वेळा कारंजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते
त्यांनी लिहिले अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ॐ शांती"असे देवेंद्र फडणवीस यांनी लिहून आपली श्रद्धांजली दिली आहे.