मराठा आरक्षणाचे विधेयक दोन्ही सभागृहात एकमताने संमत झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर येत त्यांची प्रतिक्रिया दिल्या. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार दिसले नाही. दरम्यान अजित पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर ट्वीट करत मराठा आरक्षणा संदर्भात पोस्ट करत सर्वांचे आभार मानले.
त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, शिक्षणात आणि रोजगारात 10 टक्के आरक्षण देण्याचं मराठा आरक्षण विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आलं, ही अतिशय आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे सर्व त्रुटी दूर करून हे आरक्षण देण्यात आलं आहे. मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन करतो. हे आरक्षण मंजूर करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार! असे लिहित त्यांनी सर्वांचेच आभार मानले.