जंगलातील तलावात खूप मासे आणि एक खेकडा राहायचा. मासे आणि खेकड्यांची छान मैत्री होती. एकदा अशक्त झालेला बगळा हा तलावाच्या किनाऱ्यावर उदास होऊन बसला होता. त्याला असे बसलेले पाहून खेकडा म्हणाला की, काय हो बगळे दादा असे उदास का बसले आहात? त्या खेकड्याला पाहून त्याला एक कल्पना सुचली.
बगळा खेकड्याला म्हणाला की, काय करू खेकडे दादा मी माझे पूर्ण जीवन या तलावाच्या किनाऱ्यावर व्यतीत केले आहे. पण आता काही बदलले जाणार आहे. काही लोक हा तलाव बुजवून टाकणार आहे आणि इथे शेती करणार आहे. आता हे ऐकून खेडकड्याला चिंता वाटायला लागली कारण त्याच्या सोबत त्याचे मित्र मासे हे सुद्धा मरण पावणार असे त्याला वाटायला लागले.
खेकडा घाबरून म्हणाला बगळे दादा यावर तुमच्याकडे काही उपाय आहे का? त्यावर बगळा म्हणाला की, घाबरू नकोस मी एक तलाव पाहिला आहे. जो इथून जवळच आहे. मी एक एक मासा चोचीत पकडतो आणि त्या तलावात नेऊन सोडतो. आता खेकड्याला धूर्त बगळ्याची चाल लक्षात आली न्हवती. बिचारा खेकडा त्याने पटकन बगळ्यावर विश्वास ठेवला. व जाऊन सर्व मास्यांना बोलावून आणले आता एक एक मासा बगळा चोचीत घेऊन उडू लागला पण तो दुसऱ्या तलावात न जात त्या मास्यांना तो एक पहाडावर नेऊन मारून खाऊन टाकायचा. आता एक एक करून सर्व तलावातील सर्व मासे संपले. तसेच खेकडा मात्र तेवढा राहिला होता. आता बगळ्याने विचार केला आता पर्यंत मी फक्त मासे खाल्लेत. तर आज मी खेकडा खाऊन पाहतो. म्हणून बगळा खेकड्याला म्हणाला चला खेकडे दादा आता तुमची पाळी, असे म्हणून खेड्याला बगळ्याने त्याच्या पाठीवर बसवले. व बगळा उडू लागला. आता खेकड्याने बगळ्याला विचारले की, तलाव अजून किती दूर आहे. त्यावर बगळा म्हणाला की, येईलच एवढ्यात, असं म्हणून बगळा पहाडाच्या दिशेने उडू लागला. आता खेड्याचे लक्ष्य पहाडावर पडलेल्या त्याच्या मित्र मास्यांच्या सांगाड्यांकडे गेले. सर्वदूर मास्यांचे हाडे पडलेली होती. हे पाहून खेकड्याच्या लक्षात आले की, बगळ्याने आपल्याला धोका दिला आहे व त्याने सर्व मास्यांना मारून खाऊन टाकले आहे. खेकड्याला आता बगळ्याचा प्रचंड राग आला व त्याने बगळ्याची मान घट्ट पकडून आवळली. ज्यामुळे बगळा मरण पावला. व खेकडा परत आपल्या तलावाच्या दिशेने निघून गेला.