कृती-
सर्वात आधी बीट आणि आले सोलून स्वच्छ धुवून बाजूला ठेवावे. आता आवळ्याच्या बिया काढून त्याचे 2-3 तुकडे करावे. जर तुम्ही फळे किंवा इतर भाज्या घालत असाल तर त्या सोलून बारीक करावे आणि बाजूला ठेवावे.यानंतर मिक्सरमध्ये बीटरूट, गाजर, आले, आवळा, अननस आणि 1 ग्लास कोमट पाणी घालून मध्यम तुकडे करून बारीक करावे. आता एका मोठ्या भांड्यात गाळणे ठेवावे आणि रस गाळून घ्यावा. यानंतर या रसात थोडी काळी मिरी पूड, काळे मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून सेवन करावे. तर चला तयार आहे आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस.