केसर काजू शेक रेसिपी

बुधवार, 16 ऑक्टोबर 2024 (12:05 IST)
साहित्य-
दहा ते बारा काजू 
अर्धा चमचा केशर 
दोन कप थंड दूध 
साखर  
वेलची पूड 
बर्फाचे तुकडे (इच्छेनुसार)
एका चमचा बदाम आणि पिस्ता  
 
कृती-
सर्वात आधी दुधामध्ये केशर घालून 15 मिनिटे भिजवावे. यामुळे केशराचा रंग आणि चव चांगली येईल.
आता काजू दुधात किंवा पाण्यामध्ये घालून पेस्ट बनवा. आता मिक्सरमध्ये थंड दूध, काजू पेस्ट, साखर आणि भिजवलेले केशर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करावे. यानंतर तयार शेकमध्ये वेलची पूड घालून चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता तयार शेक ग्लासमध्ये ओतावा. बर्फाचे तुकडे घाला आणि बदाम आणि पिस्त्याने गार्निश करावा. तर चला तयार आहे आपला केशर काजू शेक रेसिपी 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती