नवरात्रीचे उपवास सुरू आहे, त्यामुळे दररोज काहीतरी नवीन आणि आरोग्यदायी बनवण्याचा विचार करण्यासाठी बराच वेळ लागतो. याकरिता आज आपण पाहणार आहोत भगर पासून स्वादिष्ट असे अप्पे रेसिपी.....
सर्वात आधी भगर पीठ एका मोठ्या भांड्यात घ्या. त्यात दही, मीठ, हिरवी मिरची, जिरे आणि कोथिंबीर घाला व बॅटर तयार करा. आता अप्पे पॅन गस वर ठेवा आणि प्रत्येक साच्यात तूप किंवा तेल हलके ग्रीस करा. चमच्याने पीठ ओता. झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटे शिजवा. एक बाजू सोनेरी झाल्यावर, आप्पे उलटा आणि दुसरी बाजू शिजवा. तयार गरम अप्पे एका प्लेटमध्ये काढा व चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.