कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये तूप गरम करा, काजू आणि बदाम हलकेच भाजून घ्या. आता किसलेला नारळ तुपात घाला आणि मंद आचेवर परतून घ्या. आता दूध घाला आणि मंद आचेवर दूध घट्ट होईपर्यंत शिजवत रहा. नंतर साखर घाला आणि चांगले ढवळून घ्या. साखर घातल्यानंतर हलवा थोडा पातळ होईल. ढवळत रहा. यानंतर, वेलची पावडर आणि काजू आणि बदाम घाला. तयार नारळाचा हलवा एका प्लेटमध्ये काढा व पिस्ता गार्निश करा. तयार आहे आपला कोकोनट हलवा गरम नक्कीच सर्व्ह करा.