Bhadrakali Devi Temple नाशिकचे श्रद्धास्थान भद्रकाली देवी मंदिर

शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : नवरात्रीचे पवित्र पर्व सुरु असून नवरात्रीचे नऊ दिवस हे उत्साहाने भरलेले असतात.  भाविक देवीच्या मंदिरांना भेट देतात. याकरिता आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील जागृत देवीचे मंदिर जे अतिशय प्राचीन असून नाशिकरांचे श्रद्धस्थान आहे. ते मंदिर म्हणजे जुने नाशिक मधील भद्रकाली देवी मंदिर होय. देवीचे हे मंदिर हे नाशिक शहरातील जुने नाशिक परिसरात, पंचवटीजवळ, गोदावरी नदीच्या काठावर वसलेले असून  एक प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे.
ALSO READ: महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई
वैशिष्ट्ये- 
भद्रकाली मंदिराची रचना साधी पण प्रभावी आहे. हेमाडपंती शैलीतील काही लक्षणे येथे दिसतात, जसे की दगडी बांधकाम आणि कोरीव काम. मंदिराच्या गर्भगृहात देवी भद्रकालीची सुंदर मूर्ती आहे, जी भक्तांमध्ये भक्ती आणि भय यांचा संमिश्र भाव जागवते. तसेच नवरात्रीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. तसेच विशेष पूजा, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात.
 
इतिहास-
भद्रकाली देवी मंदिर हे प्राचीन काळापासून स्थापित असून त्याची नेमकी स्थापना तारीख अज्ञात आहे.तर काही संदर्भांनुसार, हे मंदिर १३व्या शतकातील असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येतो आणि त्याचा संबंध हेमाडपंती वास्तुशैलीशी जोडला जातो.
मंदिरातील देवी भद्रकाली ही शक्तीस्वरूप मानली जाते आणि ती काली मातेची एक रूप आहे. स्थानिक कथांनुसार, ही देवी नाशिक शहराची रक्षक आहे आणि भक्तांच्या संकटांचे निवारण करते.  
ALSO READ: Sharadiya Navratri 2025 : खान्देशची कुलदेवी जागृत श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिर जळगाव
धार्मिक महत्त्व-
भद्रकाली मंदिर हे नाशिकमधील स्थानिकांचे श्रद्धास्थान आहे. येथे येणारे भक्त संकटनिवारण, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. मंदिराचा परिसर शांत आणि निसर्गरम्य आहे, विशेषतः गोदावरी नदीच्या जवळ असल्याने येथील वातावरण अधिक पवित्र वाटते. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या वेळीही या मंदिराला विशेष महत्त्व आहे, कारण अनेक तीर्थयात्री येथे दर्शनासाठी येतात.
 
भद्रकाली देवी मंदिर नाशिक जावे कसे? 
रेल्वे मार्ग-नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर ५ किमी अंतरावर आहे. स्टेशनवरून रिक्षा किंवा टॅक्सीने सहज पोहोचता येते.
रस्ता मार्ग- नाशिक शहर अनेक शहरांना जोडलेलं असून नाशिक मध्ये पोहचण्यास अनेक बस सेवा उपलब्ध आहे.  
विमान मार्ग- नाशिकचे जवळचे विमानतळ ओझर येथे असून २० किमी अंतरावर आहे. विमानतळावरून खासगी वाहन किंवा स्थनिक बस मदतीने पोहोचता येते. 
ALSO READ: Sharadiya Navratri 2025 जागृत श्री मनोरमा देवी मंदिर देवाळ गुजरात

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती