कोरोनाची साखळी तोडायची असल्यास स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊनची गरज

शनिवार, 1 मे 2021 (15:57 IST)
कोरोना विषाणूची ही साखळी तोडायची असल्यास स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊन पाळणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यात यशस्वी होऊ असा सुर आता श्रीरामपूरकरांकडून निघतो आहे.  श्रीरामपुर पालिकेने जनता कर्फ्यु सक्तीने राबवावा.आताच आपण जबाबदारीने वागलो तर जुलै ऑगस्टमध्ये येणारी करोनाची तिसरी लाट घातक ठरणार नाही.त्यामुळे नागरिकांनीच गर्दी टाळून घरीच थांबाही साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
 
करोनाच्या काळात ऑक्सीजन व रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून जिल्ह्यात नगर, संगमनेर आणि श्रीरामपूर येथे ऑक्सिजन प्लँटची उभारणी केली जाणार आहे.
श्रीरामपूर येथे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्लॅट उभारला जाणार आहे. तसेच शिर्डी येथे लवकरच 2000 बेडचे जम्बो कोविड रुग्णालय सुरु होणार आहे. अशी माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती