राज्यात 69,710 जणांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 84.04 टक्क्यांवर

शनिवार, 1 मे 2021 (09:20 IST)
राज्यात शुक्रवारी नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. शुक्रवारी  69 हजार 710 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 38 लाख 68 हजार 976 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 84.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारीनुसार  शुक्रवारी  62 हजार 919 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 828 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 46 लाख 02 हजार 472 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 6 लाख 62 हजार 640 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
शुक्रवारी  985 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 68 हजार 813 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.50 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 41 लाख 93 हजार 686 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 26 हजार 462 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 71 लाख 06 हजार 282 नमूने तपासण्यात आले आहेत.महाराष्ट्रात 29 एप्रिलपर्यंत 1 कोटी 58 लाख 88 हजार 121 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती