नाशिक जिल्ह्याचा कोरोना पॉजेटिव्हिटी रेट सर्वाधिक : फडणवीस

शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (23:05 IST)
नाशिक जिल्ह्याचा कोरोना  पॉजेटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. नाशिक विभाग आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांतील कोरोना पॉझिटिव्हिटी ३० टक्क्यांवर आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अधिक ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला पाहिजे. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीसांनी नाशिक विभागीय आयुक्त आणि सिव्हिल रुग्णालयातील सिव्हिल सर्जन यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
नाशिकमध्ये कोरोना परिस्थिती चिंताजनक आहे. विशेषता नाशिक जिल्ह्याच्या कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. नाशिक विभागाचा आणि नगरचा पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांवर आहे. इतर जिल्ह्यांचा १० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे नाशिकमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. तसेच दौऱ्यादरम्यान सिव्हिल रुग्णालयाला भेट दिली. 
नाशिकमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ही कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. परंतु लक्षणे असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला अधिक रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले पाहिजे यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नाशिकमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या बिटको कोरोना रुग्णालयात एकूण ७७१ कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. मोठे रुग्णालय तयार केल्यामुळे नाशिककरांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. परंतु काही रुग्णांनी आणि नागरिकांना सफाई बाबत तक्रारी केल्या आहेत. याबाबत डॉक्टरांशी बोललो असता सफाई कामगारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कर्मचारी कमी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नव्या कर्मचाऱ्यांची भर्ती करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती