यासंदर्भात फडणवीस यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. यानंतर मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा सार्वजनिक करू नये, असे स्पष्ट निर्देशही फडणवीस यांनी मंत्र्यांना दिले आहे.मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी अजेंडा निघत असल्याने फडणवीस नाराज होते. त्यांनी मंत्र्यांना याची माहिती दिली. जर या घटना थांबल्या नाहीत तर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. बैठकीपूर्वी मंत्रिमंडळाचा अजेंडा छापणे चुकीचे आहे. मी मंत्र्यांना याबद्दल सांगितले आहे. मंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयांना बैठकीपूर्वी अजेंडा छापू नये असे सांगावे. अन्यथा मला कारवाई करावी लागेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.