प्रेक्षणीय स्थळ गोकर्ण

Webdunia
सोमवार, 13 जानेवारी 2025 (07:30 IST)
आपले रमणीय समुद्र किनारे आणि मंदिरांसाठी ओळखले जाणारे गोकर्ण कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील एक शांत शहर आहे. येथील रमणीय समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करितो. तसेच भव्य आणि प्राचीन मंदिरे येथील इतिहासाची साक्ष देतात.प्रत्येक वर्षी हजारो पर्यटक येथे पर्यटनासाठी येतात. गोकर्णाला  कर्नाटकचे "लपलेले रत्न" म्हणून देखील ओळखले जाते. 
 
गोकर्ण धार्मिक मान्यता-
गोकर्ण एक धार्मिक तीर्थस्थळ देखील आहे. जिथे भगवान शंकरांचे स्थान आहे. भगवान शिव गायीच्या कानामधून प्रकट झालेले आहे म्हणून या स्थळाचे नाव गोकर्ण असे सांगण्यात येते.  
 
गोकर्णचे धार्मिक स्थळ-
येथील मंदिरांवर दक्षिण भारताच्या चालुक्य व कदम्ब वस्तु शैलींचे मिश्रित प्रभाव पाहण्यास मिळतात. 
महाबळेश्वर मंदिर येथील प्रमुख मंदिर आहे. महाबळेश्वर, सेजेश्वर, गुणवन्तेश्वर, मुरुदेश्वर आणि धारेश्वर या मंदिरांना “पंच महाक्षेत्र” नावाने देखील ओळखले जाते.
 
महाबलेश्वर मन्दिर-
सह्याद्रीवर स्थित भगवान शिव यांना समर्पित हे मंदिर कमीतकमी 1,500 वर्ष जुने आहे. हे मंदिर द्रविड वास्तुकलाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ज्याच्या निर्माणमध्ये ग्रेनाइट दगडांचा उपयोग करण्यात आला आहे. याला कर्नाटकमधील सात मुक्तिस्थळांपैकी एक मानले जाते. इथे सहा फूट शिवलिंग आहे, ज्याला आत्मालिंग रूपात ओळखले जाते. पौराणिक आख्यायिकांमध्ये या शिवलिंगचा उल्लेख आढळतो. तसेच महागणपति मंदिर, भद्रकाली मंदिर, महालासा मंदिर, सोमेश्वर मंदिर, उमा महेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर हे प्राचीन वारसा लाभलेले मंदिर देखील आपल्या वास्तुकलेमुळे पर्यटकांना आकर्षित करतात. 
 
तसेच कोटि तीर्थ नावाचे एक पवित्र जलकुंड इथे आहे. व्रत-उपवास आणि धार्मिक आयोजन दरम्यान मोठ्या संख्येने लोक इथे येतात. श्रद्धाळू येथील पवित्र जलात डुबकी लावतात. हे कोटि तीर्थ गोकर्ण पासून अडीच किमी दूर आहे. 
 
नैसर्गिक पर्यटन स्थळे-
ओम बीच, कुडले बीच, हाफ मून बीच, पैराडाइज बीच हे गोकर्णमधील प्रसिद्ध आणि विशाल रमणीय समुद्रकिनारे आहे. तसेच याना गुफा, लाल्गुली जलप्रपात हे देखील रमणीय पर्यटनस्थळे आहे. 
 
गोकर्णाचा ऐतिहासिक वारसा-
सोळाव्या शतकात बनवला गेलेला मिरजन किल्ला गोकर्ण शहरापासून 11 किमी दूर राष्ट्रीय राजमार्ग 66 वर स्थित आहे. हा किल्ला अघनाशिनी नदीच्या काठावर सुमारे चार हेक्टरमध्ये पसरलेले आहे. तसेच हा किल्ला 16व्या आणि 17व्या शतकातील अनेक युद्धांचा साक्षीदार आहे.  
 
गोकर्णाला भेट देण्याची उत्तम वेळ-
गोकर्णासह जवळजवळ संपूर्ण कर्नाटकला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च. 
 
गोकर्ण कर्नाटक जावे कसे?
विमानसेवा- सर्वात जवळचे विमानतळ गोव्याचे दाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 149 किमी अंतरावर गोकर्ण आहे. तुम्ही विमानतळावरून कॅब किंवा टॅक्सी करून या शहरात पोहचू शकतात. 
 
रेल्वे मार्ग- गोकर्ण रेल्वे स्टेशनवर मोजक्याच गाड्या थांबतात. सर्वात जवळचे प्रमुख रेल्वे स्टेशन, अंकोला, असून 22 किमी अंतरावर गोकर्ण आहे. नवी दिल्ली, बंगळुरू, मुंबई, पुणे, नागपूर, जयपूर इत्यादी ठिकाणांहून अंकोलासाठी रेल्वे उपलब्ध आहेत. कारवार रेल्वे स्टेशन गोकर्णापासून 65 किमी अंतरावर आहे.
 
रस्ता मार्ग- कारवारहून गोकर्णाला जाण्यासाठी 61 किमी प्रवास करावा लागतो. तसेच हे अंकोल्यापासून सुमारे 26 किमी आणि पणजी गोव्यापासून सुमारे 154 किमी अंतरावर आहे. बेंगळुरू, मंगळुरू, म्हैसूर, कोईम्बतूर आणि रत्नागिरी येथून रस्ता मार्गाने सहज गोकर्णला पोहोचता येते.

संबंधित माहिती

पुढील लेख